मालेगावच्या मॅनिटॅब फार्मामध्ये अमेरिकन कंपनीची अब्जावधींची गुंतवणूक

मालेगावच्या मॅनिटॅब फार्मामध्ये अमेरिकन कंपनीची अब्जावधींची गुंतवणूक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

फूड व फार्मा क्षेत्रात विश्वात अग्रेसर असलेल्या अमेरिकेतील इनग्रेडीऑन कंपनीने (Ingredion Company )भारतात फूड फार्मा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील एम.बी. ग्रुपशी (M.B.Group) सलग्न मॅनिटॅब फार्मा ( Manitab Pharma )स्पेशलिटी कंपनीत अब्जावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीने उद्योग क्षेत्रात ग्लोबल स्तरावर मॅनीटॅब फार्मा कंपनीचा समावेश झाल्याने तसेच परराष्ट्रीय गुंतवणूक आल्याने मालेगाव शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.येथील एम.बी.शुगर्सने सन 2017 मध्ये स्प्रेड्राईड मॅनीटाॅलचे भारतातील सर्वात पहिले उत्पादन सुरू करत मुहूर्तमेढ रोवली होती.

भारतातील फार्मा क्षेत्रातील अग्रणी कंपन्यांना आपले उत्पादन पुरवत आपला मोर्चा परदेशी बाजारपेठांकडे वळविला होता. कोरिया, इजिप्त, तैवान,नेपाळ, श्रीलंका, आदी देशांमध्ये व्यापारास सुरुवात केली आहे. बांगलादेश,थायलंड मध्ये व्यापार सुरू होण्याच्या मार्गावर आहे .एम. बी. शुगर नव्या बाजारपेठा काबीज करतानाच देशाच्या विदेशी मुद्रा भांडार वाढविण्यास देखील हातभार लावत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अल्पावधीतच मॅनिटॅबमध्ये एम.बी. शुगरची प्रगती लक्षात घेत अमेरिकेतील इन्ग्रेडिऑन या फुड फार्मा क्षेत्रातील कंपनीने मॅनिटॉल उत्पादनामध्ये रुची असल्याचे संकेत दिले होते.या पार्श्वभूमीवर एम. बी. शुगर व इन्ग्रेडियऑन कंपनीची संयुक्त घटक कंपनी करुन मॅनिटॅब स्पेशालिटीजची निर्मिती केली गेली. या मॅनिटॅब कंपनीने मॅनीटाॅल व इतर घटकांचे उत्पादन घेतले जात आहे. हा पदार्थ टॅबलेट मध्ये मुख्यता वापरला जातो या संयुक्त कंपनी निर्मितीस एम.बी. शुगर्स चे संचालक ऋषभ, सौरभ व नेहा लोढा यांचा मोठा वाटा राहिला आहे .

अमेरिकेतील इन्ग्रेडिऑन कंपनीने मॅनी टॅब फार्मामध्ये अब्जावधीची गुंतवणूक केली असल्याने रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणात चालना देखील मिळणार आहे. मॅनी टॅब फार्मा मध्ये गुंतवणूक केल्यानंतर इन्ग्रेडिऑन चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जिम झॅली यांच्यासह कंपनीच्या एशिया पॅसिफिक प्रमुख वाॅल्डरींन इव्हान्स, जागतिक संपर्क अधिकारी राणा कयाल, भारतातील प्रमुख अधिकारी प्रकाश कृष्णन, लेखाधिकारी मयंक गांधी यांनी मालेगावी मॅनिटॅब फार्मा कंपनीस भेट देत पाहणी केली.

इन्ग्रेडियॉनच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे एम.बी. शुगरचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक विजयकुमार लोढा, तंत्र संचालक दिनेशकुमार लोढा, विपणन संचालक अनिलकुमार लोढा सम्यक लोढा, ऋषभ लोढा, सौरभ लोढा यांनी त्यांचे स्वागत केले. मॅनीटॅब उद्योगाची पाहणी केल्यानंतर इन्ग्रेडियॉनचे अध्यक्ष जिम झॅली यांनी कंपनीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात एम बी ग्रुप बरोबर अजून नवीन उत्पादनामध्ये एकत्र काम करण्यात इच्छुक असल्याचे सांगत भविष्यात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत दिले असल्याची माहिती एमबी शुगरचे संचालक अनिलकुमार लोढा माहिती यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com