जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर
Patrick Semansky
मुख्य बातम्या

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर

चीनला कोरोनावर उत्तर द्यावेच लागेल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

वॉशिंग्टन|Washington -

करोना विषाणूसंदर्भात चीनने माहिती लपवल्याचा आणि जागतिक आरोग्य संघटना चीनधार्जिणी असल्याचा आरोप करत अमेरिकेने वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी याआधी दिली होती. मात्र आता अमेरिकेने औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही, असे ट्रम्प सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला अधिकृत पत्र देखील पाठवले आहे.

अमेरिकेचे खासदार बॉब मेनंडेझ यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, कोरोना साथीमुळे चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे अशी माहिती कार्यालयाकडून काँग्रेसला मिळाली आहे. तसेच, अमेरिकेने याबाबत संयुक्त राष्ट्राला अधिकृतरित्या कळवले आहे.

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडल्याने डब्ल्यूएचओ आणि इतर देशांसाठी हा जबरदस्त झटका मानला जात आहे. ट्रम्प यांनी मे महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. चीनने कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीनने कायम माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. चीनला कोरोनावर उत्तर द्यावेच लागेल, असेही यावेळी ट्रम्प म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोपही यावेळी ट्रम्प यांनी केला.

Deshdoot
www.deshdoot.com