Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत नरसंहार! अज्ञाताकडून शाळेत अंधाधुंद गोळीबार, १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू

अमेरिकेत नरसंहार! अज्ञाताकडून शाळेत अंधाधुंद गोळीबार, १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

अमेरिकेत (America) नरसंहाराची घटना घडली आहे. एका अज्ञाताकडून टेक्सासमधील (Texas) एका शाळेत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.

- Advertisement -

या गोळीबारात १८ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात १३ मुले, शाळेचे कर्मचारी आणि काही पोलीस जखमी झाले आहेत. टेक्सासमधील युवल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा देखील जाहीर केला आहे. हल्लेखोर मारल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे. त्याच्या ओळखीबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाहीये.

- Advertisment -

ताज्या बातम्या