अंबादास दानवेंचे विधानपरिषदेच्या उपसभापतींना पत्र; मुख्यमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ मोठी मागणी

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या (BJP and Shinde Group) आमदारांनी (MLA) राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली. यानंतर विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंग (Infringement of Rights) आणण्यात आला असून ८ मार्चला हक्कभंग प्रस्तावावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निर्णय देणार आहेत.

तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. त्यावर आता ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. त्याबाबत दानवे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना पत्र देखील लिहिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

…तर कारवाई व्हायलाच हवी; राऊतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार स्पष्टच बोलले

अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे की, मी महाराष्ट्र विधानपरिषद (Maharashtra Legislative Council) नियम २४९ अन्वये महानगर माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याविरुद खालीलप्रमाणे विशेषाधिकार भंगाची सूचना देत आहे. रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी शासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी शेतकरी, विद्यार्थ्याचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या विषयावरून बहिष्कार घातला होता.

हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊत म्हणाले, “मी तुरुंग गेलेला माणूस आहे, त्यामुळे…”

या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले असे वक्तव्य केले आहे. राज्याच्या प्रमुखपदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा हीन भाषेचा वापर केल्यामुळे विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद म्हणून माझा व सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान झाला आहे.

शासकीय रुग्णालयात परिचारिकेला मारहाण : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याने मी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव देत आहे. कृपया सदरहू प्रस्ताव स्वीकृत करुन पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विधानपरिषद विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी आपणांस विनंती आहे, असे दानवे यांनी पत्रात लिहिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *