पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण?, 'ही' नावे चर्चेत

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण?, 'ही' नावे चर्चेत

दिल्ली | Delhi

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला. कॅप्टन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

दरम्यान संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्यांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे चर्चेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पदासाठी तीन नावांची यादी तयार केली आहे. यात पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव पहिले आहे. तर पंजाबमधील मंत्री सुखजिंदर रंधावा यांचा दुसरा नंबर आहे. तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री राजेंदर कौर भट्ठल यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com