उद्योगांसोबतच ग्रामीण,कृषी क्षेत्राच्या विकास नियोजनाने अर्थव्यवस्थेला उभारी : बनसोड

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन
उद्योगांसोबतच ग्रामीण,कृषी क्षेत्राच्या विकास नियोजनाने अर्थव्यवस्थेला उभारी : बनसोड

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster) पुढील 15 वर्षांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अद्ययावत पायाभूत सुविधांची निर्मिती करून स्वत:ला सातत्याने अद्यावत करीत आहे.

उत्पादन क्षेत्र विकसित (Develop manufacturing sector) करण्याच्या गरजेवर भर देताना त्या सुविधा फक्त उद्योगांसाठी मर्यादित न ठेवता ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या (Agricultural Sector) विकासाचे नियोजन देखिल केल्यास राष्ट्रीय अर्थव्यवस्था (National economy) शाश्वत पद्धतीने वाढणे शक्य होणारआहे,असे प्रतिपादन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Chief Executive Officer Leena Bansod) यांनी केले.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या (Nashik Engineering Cluster) आज 15 व्या वर्धापन दिनानिमित्तं (Anniversary) एनइसीच्या इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन (Inauguration of Innovation Incubation Center of NEC) बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या.या इनोव्हेशन सेंटरमध्ये (Innovation Center) तरुण उद्योजक (Young entrepreneur) आणि नवकल्पकांसाठी इनोव्हेटर्स को-वर्किंग स्पेस (Innovators Co-Working Space), मेंटॉरिंग झोन (Mentoring Zone), मेकर लॅब (Maker Lab), कॉन्फरन्स रूम (conference room) आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर (Common Facility Center) आहे.

यावेळी बोलताना एनइसीचे अध्यक्ष विक्रम सारडा (NEC President Vikram Sarada) यांनी एनइसीचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. इन्क्युबेशन सेवा (Incubation services) तळागाळातील आणि विशेषत: ग्रामीण नवउद्योजकापर्यंत देण्याचे प्रयोजन स्पष्ट केले. एनइसी त्याच्या विकासाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि ग्रामीण कृषी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (Agricultural Technology Sectors) त्याची मुळ क्षमता वाढवणे हे आमच्या विकास योजनांमध्ये निश्चितपणे समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला एनइसीचे सीएमडी व ऋषभ इन्स्ट्र्यूमेंटसचे नरेंद्र गोलिया (Narendra Golia of Rishabh Instruments), शरद शहा, एबीबीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे, हिरामण अहिरे, एम्पायर फूडस्चे अध्यक्ष हेमंत राठी, एम्पायर फूडस्चे एमडी उमेश राठी, नाशिक इन्सुलेशनचे एमडी संजीव कौशिक , नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक मनीष कोठारी, आणि नरेंद्र बिरार, रमेश वैश्य, संजीव नारंग, दिलीप शहा, भैयासाहेब वराडे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत करताना नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस के माथूर यांनी इनोव्हेशन आणि इनक्युबेशनच्या क्षेत्रात नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा प्रवास सादर केला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना मनिष कोठारी यांनी लीना बनसोड यांचे ग्रामीण प्रशासन विकास आणि ग्रामीण भागाचा उद्योजकता व आर्थिक विकास याचे योगदानाबद्दल माहिती दिली.नरेंद्र गोलिया यांनी एनईसीच्या भविष्यातील विकास योजनांची माहिती दिली.

स्टार्टअप्सच्या दोन यशोगाथा

एनईसीद्वारे उभ्या केलेल्या स्टार्टअप्सच्या दोन यशोगाथा दाखवल्या. ज्यांनी स्मार्ट ब्रिज सर्व्हिलन्स सिस्टीम विकसित केले आहेत आणि यशस्वीरित्या लाँच केले आहेत आणि दुसरे स्टार्ट-अप असलेले रामबंधू मसालेचे चेअरमन हेमंत राठी यांचे मार्गदर्शन लाभलेले, ज्यांनी नाशिकमध्ये व्यावसायिकरित्या त्यांचे आरोग्य खाद्यपदार्थ लॉन्च केले आहेत आणि या स्टार्ट-अप मध्ये आत्तापर्यंत 60हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

एनइसीच्या मोफत कार्यशाळा

एनइसीने नाशिक इंडस्ट्रीजच्या अभियंत्यांसाठी एनइसी मध्ये उभारलेल्या नवीन चाचणी, कॅलिब्रेशन आणि व्हॅलिडेशन इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल त्यांना अपग्रेड करण्यासाठी मोफत कार्यशाळा आयोजित केली होती जेणेकरून ते नाशिक क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी त्यांचा वापर करू शकतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com