'अब रूल पुष्पा का'; 'पुष्पा २'च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा

'अब रूल पुष्पा का'; 'पुष्पा २'च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा

मुंबई | Mumbai

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा २ या सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहात आहे. अशातच पुष्पाचा खतरनाक किलर लुक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी पुष्पाची झलक दाखवणारा टिझर प्रदर्शित झाला होता. हा टिझर पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी पुष्पा २ मधील त्याचा किलर लुक समोर आला आहे तसेच चाहत्यांना गिफ्ट देत निर्मात्यांनी पुष्पा २चा टीझर प्रदर्शित केला आहे...

'अब रूल पुष्पा का'; 'पुष्पा २'च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा
अजित पवारांनी 'नॉट रिचेबल'च्या वृत्तावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘पुष्पा २’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा हा अत्यंत रौद्र अवतारात बघायला मिळत आहे. त्याच्या गळ्यात वेगवेगळे दागिने, हारतुरे तसेच लिंबाची माळ बघायला मिळत असून चेहऱ्यावर दैव नर्तक ज्या पद्धतीने रंगरंगोटी करतात त्याप्रमाणे पुष्पाच्या चेहऱ्यावरही मेकअप केला गेला आहे. तर हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांना वेड लागले आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक शेअर करण्यात आला होता. रश्मिकाने (Rashmika Mandhana) 'पुष्पा द राईज' या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली नायिकेची भूमिका साकारली होती. तसेच पुष्पा द राइज हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तेव्हा पुष्पा द राइज चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

'अब रूल पुष्पा का'; 'पुष्पा २'च्या टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची होतेय चर्चा
शरद पवारांच्या अदानी समूहाबाबतच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार? राऊत म्हणाले...

दरम्यान, त्यानंतर अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पा २ म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa the Rule)या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com