परिवहन मंत्र्यांसह, वरिष्ठ अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

jalgaon-digital
3 Min Read

पंचवटी । प्रतिनिधी

राज्य परिवहन विभागातील एका निलंबित अधिकार्‍याने परिवहनमंत्री तसेच राज्याचे परिवहन सचिवांसह राज्यभरातील अधिकार्‍यांवर कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार व मनिलॅड्रींगचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रारच सबंधीत अधिकार्‍याने मेलद्वारे नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशीचे आदेश दिले असून ते या तक्रारीतील सत्यता तपासणार आहेत.

गजेंद्र टी. पाटील असे तक्रार करणार्‍या अधिकार्‍याचे नाव असून ते राज्य परिवहन नाशिक विभागाशी संलग्न धुळे विभागात मोटार वाहन निरिक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यांना काही आरोपांवरून निलंबीत करण्यात आले आहे. निलंबीत कार्यकालात ते नाशिक मुख्यालयात हजर असल्याने त्यांनी येथे तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील परिवहन विभागात चांगल्या विभागात बदली करण्यासाठी परिवहन सचिव कार्यालयात 2 ते 100 कोटी रुपयांची लाच घेतली जाते. यातील अर्धा हिस्सा परिवहन मंत्र्यांना पाठवला जातो. राज्यातील सर्व परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी संघटीतपणे चेकपोस्ट तसेच मालवाहतुकदारांची अवैध कामे करत आहेत. काही आरटीओ कार्याल्यात न्यायालयाची बंदी असतानाही बेकायदेशीर बीएस 4 वाहनांची नोंदणी अद्यापही केली जात आहे. जळगावात अशा 2 हजार 400 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. तसेच बहूतांश अधिकार्‍यांना भ्रष्टाचार करून पैसे संकलीत करण्यास भाग पाडले जात असल्याचेही आरोप पाटील यांनी केले आहेत.

दरम्यान तक्रारदार पाटील यांच्यावर भ्रष्टाचार तसेच इतर आरोप असून त्यांना निलंबीत करण्याची नोटीस नाशिक विभागाचे परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी बजावली आहे. तसेच पाटील यांच्या धुळे तसेच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथे वादग्रस्त तसेच इतरांविरोधात विनाकारण तक्रारी करून अधिकारी, कर्मचार्‍यांना त्रास दिल्याच्या तक्रारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चौकशी अंती निष्कर्ष

तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाली असली तरी त्यामध्ये परिवहन मंत्र्यांसह राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे असल्याने या तक्रारीची सत्यता तपासण्यासाठी चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी दिले आहेत. याची कार्यवाही सुरू झाली असून परिवहन विभगातील अधिकार्‍यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात सर्वांचे चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. यानंतरच निष्कर्षापयंंर्ंत पोहचता येईल.

संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त , गुन्हे

यांच्यावर आरोप

परिवहन मंत्री अनिल परब, राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उप परिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे , अवर सचिव परिवहन विभाग डी.एच. कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा बजरंग खरमटे , नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर,

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *