Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागामणे क्रीडांगणावरून आरोप-प्रत्यारोप

गामणे क्रीडांगणावरून आरोप-प्रत्यारोप

नाशिक । किशोर चौधरी | Nashik

प्रभाग क्रमांक 31 मधील वासननगर येथे असलेल्या जागेवरील गामणे क्रीडांगणाची (Gamane Playground) दुरवस्था झाल्याने राजकीय आरोप- प्रत्यारोप (Political allegation) सुरू झाल्याने क्रीडाप्रेमी संभ्रमात पडले आहे.

- Advertisement -

ठाकरे गट शिवसेना (shiv sena) उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ यांनी नुकतीच स्वाक्षरी मोहीम (signature campaign) या ठिकाणी राबवली होती. त्याच पक्षाचे नगरसेवक असलेले सुदाम डेमसे यांनी मात्र याबाबतीत कार्यक्रम करणारे व मनपा यास सर्वस्वी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सदर मैदानाचा वापर मनपा अनेक पैसे घेऊनही कार्यक्रमांना परवानगी देते.

मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता (Cleanliness) करत नाही. कार्यक्रम करणार्‍यांनाही स्वच्छता करून घ्यायला भाग पाडत नसल्याचे दिसत असल्याने राजकीय मतभेद (political differences) याबाबतीमध्ये निर्माण होऊ लागले आहेत. एकाच पक्षाच्या दोघेही पदाधिकार्‍यांनी केलेले आरोप- प्रत्यारोपामुळे मात्र नागरिक संभ्रमात पडले आहेत. सदर मैदानाचा वापर फक्त मैदानी खेळ (Outdoor games) व क्रीडाप्रेमासाठीच झाला पाहिजे.

सकाळ, संध्याकाळ फिरायला येणार्‍या वृद्ध व महिलांसाठी मोकळा श्वास घेण्यासाठी येत असतात. त्या सर्वांची बाजू ओळखून या ठिकाणी काम होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रमांमुळे ग्राउंडची लेव्हल व स्वच्छता या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची (Toilets) मोडतोड झाली असल्याने त्याबाबतीत सर्वस्वी जबाबदार जो असेल त्यास जबाबदार धरले पाहिजे, ते मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सदर मैदानावर प्रशासनाने ज्या मंडळाला व व्यक्तींना मैदानाचा उपयोग सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करण्यास परवानगी दिली होती अशा मंडळाकडून झालेले नुकसान भरपाई व साफसफाई करून घ्यावी. एकंदरीत असे दिसते की, त्यांनीच मैदान खराब करायचे व नंतर स्वाक्षरी मोहीम राबवायची ही कुठपर्यंत योग्य आहे, तसेच रात्री, अपरात्री कुठले टवाळखोर मुले व मंडळाचे आहेत, याचा तपास प्रशासनाने व पोलीस करावे व अशांवर योग्य ती कारवाई करावी. या ठिकाणी सदर मैदानावरती ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला व लहान खेळणारी मुले यांच्यासाठी क्रीडांगणाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.

– सुदाम डेमसे, नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या