पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार

पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार

राज्यात करोनाची साथ आटोक्यात आली असून महाविद्यालये आणि पाचवी ते दहावीचे वर्ग (school reopen)सुरू झाले आहेत. यानंतर आता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचीही प्रत्यक्ष शाळा (school reopen) सुरू करण्यास टास्क फोर्सने (task force)हिरवा कंदील दाखवला आहे. आज, गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या (cabinet meeting)बैठकीत हा निर्णय झाला. शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर (teacher)अधिक असणार आहे.

पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार
कतरिना-विकी लग्नातूनही असे मिळवणार पैसे

गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा (school reopen)1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलाय. विशेष म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांची दुमत होते. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते दहावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

पहिली ते बारावीपर्यंत सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता. राज्यात कोविड-१९ संक्रमणग्रस्तांची संख्या गेले काही महिने सातत्याने कमी होत आहे. परिणामी परिस्थिती सामान्य होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आणले आहेत.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होईपर्यंत नियम व अटी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत.

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय.

बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.

युरोपमध्ये कोविड परिस्थिती बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

Related Stories

No stories found.