मुख्यमंत्री देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश नाशिक मनपात करणार का?

मुख्यमंत्री देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश नाशिक मनपात करणार का?

सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्रीची भेट

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड (Cantonment Board) बरखास्त करून तेथील नागरिकांचा समावेश लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याबाबत केंद्र सरकारने (Central Government) निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही राज्य शासनाच्या (State Government) माध्यमातून सुरू आहे...

या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीचा समावेश नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) करण्याबाबत खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या माध्यमातून लवकरच एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत...

देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे अधिकार मिळावेत, त्यांच्या विकासाला चालना मिळावी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने कॅन्टन बोर्डाचा समावेश महापालिका अथवा नगरपरिषदांमध्ये करण्याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे.

तसा अहवाल बनविण्याचे काम युद्ध पातळी सुरू झाले आहे. देवळाली कॅम्प बोर्डातील मतदार संख्या ५० हजार तर लोकसंख्या ७५ ते ८० हजारांवर पोहोचली आह. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या या भागाला नागरी सुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात व येथील जनतेला त्यांचा न्याय हक्क कायम राहावा या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेत संपूर्ण देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीचा समावेश करण्यात यावा. जेणेकरून महापालिकेप्रमाणे रस्ते, पाणी, वीज व इतरही मूलभूत सुविधा प्राप्त होतील.

यासाठी येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आहे. लवकरच सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन याबाबत देवळालीकरांचे म्हणणे मांडणारा आहेत.

महानगरपालिकेत देवळाली कॅन्टोन्मेंट समावेश करा, अशी मागणी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र नेते विश्वनाथ काळे, भाजपचे स्थानिक नेते व बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया, गवळीवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश कदम, सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, प्रेस कामगार नेते देविदास गोडसे, व्यापारी बँक संचालक अरुण जाधव, शिवसेनेचे दत्ता सुजगुरे, विष्णुपंत गोडसे, राजाभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास धुरजड, राजेंद्र जाधव, सायरा शेख, सोमनाथ खातळे, धीरज मांडे, गिरीश धुरजड, मनसेचे जिल्हा नेते भास्कर चौधरी, शहराध्यक्ष गोकुळ जाधव, रिपाई शहराध्यक्ष सुरेश निकम, आदर्श सावंत, कुंदन दोंदे, बाळासाहेब दोंदे आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com