All is not Well in Ladakh! ‘थ्री इडियट्स’मधील ‘रिअल रँचो’ मायनस ४० डिग्रीमध्ये करणार उपोषण; पंतप्रधान मोदींना म्हणाले...

All is not Well in Ladakh! ‘थ्री इडियट्स’मधील ‘रिअल रँचो’ मायनस ४० डिग्रीमध्ये करणार उपोषण; पंतप्रधान मोदींना म्हणाले...

दिल्ली | Delhi

'थ्री इडियट्स' या सिनेमातील आमिर खानच्या भूमिकेमुळं प्रकाशझोतात आलेले लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे लडाखमधील कडाक्याच्या थंडीत उपोषणाला करणार आहेत.

या उपोषणाला त्यांनी क्लायमेट फास्ट असे म्हटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लडाखमधील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. वांगचूक हे २६ जानेवारीपासून ५ दिवस उणे ४० अंश तापमानात उपोषणाला बसणार आहे.

All is not Well in Ladakh! ‘थ्री इडियट्स’मधील ‘रिअल रँचो’ मायनस ४० डिग्रीमध्ये करणार उपोषण; पंतप्रधान मोदींना म्हणाले...
दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण आले समोर

अलीकडे केंद्राने जम्मू कश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० रद्द करून लडाख आणि कश्मीर दोन केंद्रशासित प्रदेश जरी केले असले तरी पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय प्रतिकूल आणि संवेदनशील असलेल्या लडाखमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे जो उत्तरेकडील काराकोरम पर्वत आणि दक्षिणेकडील हिमालय पर्वतांच्या दरम्यान आहे. हा भारतातील विरळ लोकसंख्या असलेल्या भागांपैकी एक आहे.

All is not Well in Ladakh! ‘थ्री इडियट्स’मधील ‘रिअल रँचो’ मायनस ४० डिग्रीमध्ये करणार उपोषण; पंतप्रधान मोदींना म्हणाले...
गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिले 'हे' आदेश

वांगlचुक यांनी एक व्हीडिओ पोस्ट करीत, लडाखला गंभीर चिंतेचा सामना करावा लागत आहे, एकूणच आर्थिक विकास आणि लडाखच्या विकास वेगाने करण्यासाठी केंद्र सरकारने जरी निर्णय घेतले असले तरी लडाखकडे केंद्राने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांना लडाखकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

खाणकाम आणि इतर विकास कामांमुळे हिमखडक वितळू शकतात आणि येथील पिण्याच्या पाण्याच्या मर्यादीत स्त्रोतावर परिणाम होईल असा सावधानतेचा इशारा त्यांना दिला आहे. लडाख भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आणि कारगिल आणि इतर युद्धांमध्ये येथील नागरीकांनी आपले योगदान दिले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

All is not Well in Ladakh! ‘थ्री इडियट्स’मधील ‘रिअल रँचो’ मायनस ४० डिग्रीमध्ये करणार उपोषण; पंतप्रधान मोदींना म्हणाले...
क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोर्टाचा दणका!

सोनम वांगचुक यांनी आपल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदी आणि शहा यांना आवाहन केलं की, लडाखबाबत उच्चस्तरावर तातडीनं कार्यवाही करा. पंतप्रधानांना माझं आवाहन आहे की, लडाख आणि अन्य हिमालयीन क्षेत्रांना वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. मी २६ जानेवारीपासून पाच दिवसांच्या उपोषणाला बसणार आहे. जर मायनस ४० असणाऱ्या खादुर्ंगला इथं उपोषणादरम्यान मी वाचलो तर आपण पुन्हा भेटुयात.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com