Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या'या' उपक्रमासाठी सर्वच विभाग अ‍ॅक्शन मोडवर

‘या’ उपक्रमासाठी सर्वच विभाग अ‍ॅक्शन मोडवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) अंतर्गत स्वच्छ नाशिक उपक्रमात (Clean Nashik initiative) सर्वच विभाग अ‍ॅक्शन मोडवर (Action mode) आले असून, शहरातील विविध भागांमध्ये विविध स्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

- Advertisement -

मनपा आयुक्तांच्या (Municipal Commissioner) नेतृत्वाखाली घनकचरा विभागाद्वारे (Solid Waste Department) या मोहिमेचे विशेष नियोजन केले जात आहे. देशभरात सुरू असलेल्या स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत नाशिकने अग्रक्रम मिळवावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रशासन सोबतच नागरिकांच्या बेजबादार वर्तनामुले हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. पूर्वीच्या ढासळलेल्या 16 क्रमांकावरून मनपाने मागिल वर्षात सूधारणा करीत सहाव्या क्रमांकामजल मारली होती. अगदी थोडक्यात पहिल्या पाच मधला क्रमांक हुकला होता.

आता पहिल्या पाचात येण्यासाठी मनपा आयुक्तांनी कंबर कसली आहे घनकचरा विभागाचे संचालक आवेश पलोड (Avesh Palod, Director of Solid Waste Department) यांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी विविध विभागांच्या नियोजनाच्या बैठका गतिमान झाले आहेत. स्वच्छ भारत उद्दिष्ट कृतीसाठी बांधकाम विभाग (Construction Department) ड्रेनेज, उद्यान, आरोग्य या विभागांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यामाध्यमातून शहरातील शौचालयांचे दुरुस्तीे, त्यांचे नूतनीकरण, शहरातील पदाचारी मार्ग दुभाजक यांच्या तुटलेल्या भागांची दुरुस्ती, त्यांची रंगरंगोटीे, दुभाजकातील वाळलेली रोपेे काढून त्या ठिकाणी माती टाकून नवीन झाडे लावणे, ठिकठिकाणी टाकल्या जाणार्‍या बांधकामाच्या मलब्याला बंदी घालणे, व्यवसायिक निवासी भागातून रस्त्यावर फेकल्या जाणार्‍या कचर्‍याला अटकाव करुन जनप्रबोधन करणे यासारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता जागर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

गोदावरी नदीच्या (godavari river) काठावर ठिकठिकाणी निर्माल्य कलश लावणे, पुरोहित संघाच्या बैठका घेऊ त्याद्वारे त्यांनाही प्रबोधन करणे, व्यावसायिक व दुकानदारांच्या बैठका घेऊन याबाबत जनजागरण करणे अशा विविध उपायोजना करण्याचे नियोजन केले जात आहे. मध्यंतरी हॉटेल चालकांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे संकेत दिले होते त्याच धर्तीवर व्यापारी वर्गांच्या बैठकांचा आयोजन केले जाणार आहे.

पुरोहित संघाची बैठक घेऊन त्यांनाही निर्माल्य नदी पात्रात न टाकता कलशात टाकण्याची सूचना दिली जाणार आहे. ज्या माध्यमातून नदीपात्र स्वच्छ राहण्यास मदत होईल जनजागृती करणे हाच एकमेव उद्देश हाती घेण्यात आला असून प्रशासकीय यंत्रणाही सक्षमपणे कामास लावण्याचा धडाका हाती घेण्यात आला आहे. येणार्‍या काळात स्वच्छ भारत अभियानात नाशिक हा पहिल्या 5 मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

शासनाच्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जाते बांधकाम साहित्य फेकण्यापूर्वी मनपा प्रशासनाला सूचना दिल्यास आठशे रुपये प्रति टन या दराने मनपा कचरा मलबा उचलून नेते. आठ हजार रुपयांच्या दंड भरण्यापेक्षा प्रशासकीय मार्गाने आपला मलबा देऊन शहर स्वच्छतेत आपले योगदान द्यावे.

– डॉ. आवेश पलोड घनकचरा विभाग संचालक

- Advertisment -

ताज्या बातम्या