Friday, April 26, 2024
Homeनाशिक७/१२ साठी ८/१२ महत्वाचा; उद्या बाजार समित्या राहणार बंद

७/१२ साठी ८/१२ महत्वाचा; उद्या बाजार समित्या राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात उद्या मंगळवारी (दि. ८) रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद राहणार आहेत. याबाबतची माहिती बाजार समिती व्यवस्थापणाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ७/१२ साठी ८/१२ महत्वाचा असून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनांच्याकडून केले जात आहे.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून एक पत्रक काढण्यात आले असून यामध्ये मंगळवार दि. 08/12/2020 रोजी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांनी पाठिंबा दिला आहे म्हणून भारत बंद असल्याने सटाणा बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य व डाळिंब लिलावाचे कामकाज बंद राहतील. बुधवारी नियमितपणे बाजार समिती सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभपती देविदास पिंगळे यांनीदेखील एक पत्रक काढले असून यामध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषि कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवारी (दि. ८) पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वच कृषि उत्पन्न बाजार समित्याही बंद राहणार आहेत.

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीला अडथळा निर्माण होऊन शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सोमवारी ( दि.७) आपल्या शेतातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात तोड करू नये, शेतकऱ्यांनीही आपला केवळ एक दिवस या आंदोलनाला द्यावा, असे आवाहन नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

केंद्र सरकारच्या कृषि विषयक तिन्ही कायद्यांमुळे शेतकरी भरडला जाणार आहे. देशातल्या सर्व बाजार समित्या भरडल्या जाणार आहेत.त्यामुळे पुकारलेल्या भारत बंदमुळे बाजार समितीही बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.७) शेतमालाची तोड करू नये. शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होऊ नये आणि त्यांचे नुकसान टळावे, यासाठी खबरदारी म्हणून त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या