Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअन् भारताच्या त्या स्फोटोने जगभरात खळबळ माजली

अन् भारताच्या त्या स्फोटोने जगभरात खळबळ माजली

११ मे १९९८चा तो दिवस होता. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात भारताने अणुचाचण्या केल्या. त्यानंतरसंपूर्ण जगात खळबळ माजली. या अणुचाचण्यांमुळे भारतावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती.

अमेरिका, जापानसह अनेक देशांनी निर्बंध लादले होते. ११ व १३ मे अशा दोन दिवसांत पाच अणू चाचण्या भारताने केल्या. त्यानंतर अणूउर्जा विभागाचे अध्यक्ष आर.चिदंबरम आणि पंतप्रधानांचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी १७ मे १९९८ ला झालेल्या एका पत्रकार परिषदेत या चाचण्यांची माहिती दिली.

- Advertisement -

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम १९७४ मध्ये अणुचाचणी केली होती. त्यानंतर अटबिहार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पोखरण -२ ही चाचणी केली. भारताने ११ मे आणि १३ मे १९९८मध्ये केलेल्या अणुचाचण्यांना दिले गेलेले नाव आहे. या दोन दिवसात मिळून एकूण पाच अणुचाचण्या केल्या गेल्या.

११ मे रोजी तीन तर १३ मे रोजी दोन अशा एकूण पाच अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या. यातील पहिला स्फोट फ्युजन बॉम्ब होता तर इतर फिजन बॉम्ब होते.या अणू चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २० मे ला पोखरणला भेट दिली होती.

चाचण्यानंतर पत्रकार परिषदेत व्हिक्टरी म्हणजेच विजयी भावमुद्रा दाखवताना भाभा अटोमिक रिसर्च सेंटरचे (BARC) तत्कालीन संचालक संथानम, अणूउर्जा विभागाचे अध्यक्ष आर.चिदंबरम आणि पंतप्रधानांचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार ए.पी.जे अब्दुल कलाम.

- Advertisment -

ताज्या बातम्या