मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिकमध्ये साहित्य संमेलन

लोकहितवादी मंडळाला मिळाला मान
साहित्य संमेलन
साहित्य संमेलन

औरंगाबाद

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरातच होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या निश्चित तारखा नाशिककरांशी चर्चा करून नक्की करण्यात येतील.

यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील एकाच संस्थेला निमंत्रण पाहणीसाठी निवडले आणि त्याला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहवाल महामंडळाला दिला.नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.

९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे (दिल्लीसाठी) एक आणि अंमळनेरचे एक अशी निमंत्रण आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठविले होते. या फेर निमंत्रणात सरहदन मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणी केली होती. साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमत: नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांनी अवधी कमी असल्यामुळे साहित्य महामंडळाच्या बैठकीसाठी मोठा वेळ जाईल म्हणून स्थळ निवड समितीच्या शिफारशीची प्रत सर्व सदस्यांना पाठवावी आणि त्याच वेळी स्थळनिवड समितीचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सर्व मराठी जनतेसाठी संमेलन स्थळाची घोषणा करावी असे ३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत ठरले. त्यानुसार समितीच्या व साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला आयोजित केले जाईल अशी घोषणा केली आणि नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे महामंडळाच्या वतीने स्पष्ट केले.

संमेलनाध्यक्षांची २४ रोजी निवड

नाशिकला साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच २४ जानेवारीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष निवडणार असे ठरवण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com