राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेचं विधान परिषदेतलं पद धोक्यात?
राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray Group) गटातील विधानपरिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी रविवारी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

अशातच आता कायंदेंनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर विधान परिषदेमधील विरोधीपक्ष नेतेपदही ठाकरे गटाकडून जाणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार होते.

राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Hardeep Singh Nijjar : मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या

त्यात कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ आमदार आहेत. ही समीकरणे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आल्याने राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे.

आज अजित पवारांना राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर पवारांनी आपल्या खास शैलित प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आमची राष्ट्रवादीची बैठक आधीच ठरली आहे. जयंत पाटील आणि मी फार आधीच ती ठरवली आहे. या बैठकीचा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कसलाही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही ९ जूनला जी सभा घेणार होतो, ती पावसामुळे घेता आली नाही. ती निमंत्रितांची सभा २१ जूनला आयोजित केली आहे. स्वतः पवारसाहेबांनी ती सभा ठेवली आहे.असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
बर्थडे बॉय केक कापत होता अन् तेवढ्यात त्याच्या चेहऱ्याने घेतला पेट, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

पुढे ते म्हणाले की, "विधानसभा, विधानपरिषदेत जेव्हा विरोधी पक्षनेतेपद देण्याची वेळ येते तेव्हा ज्यांच्या जागा सर्वात जास्त त्यांना ते विरोधीपक्ष नेते पद देतात. २०१४ ला आम्ही ४१ निवडून आलो होतो आणि काँग्रेस ४२ निवडून आलो होतो तरी ५ वर्ष काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होते. शेतकरी कामगार पक्षाचे तीन सदस्य, स्वर्गीय आबासाहेब देशमुख आणि इतर दोघे आमच्या पाठिंब्याने निवडून आले होते. त्यामुळे आता तुम्ही (पत्रकारांनी) सांगितल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू, असे अजित पवारांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

विधानपरिषदेतील पक्षीय संख्याबळ

भाजप : 22 ठाकरे गट : 09 शिवसेना : 02 राष्ट्रवादी काँग्रेस : 09 काँग्रेस : 08 अपक्ष इतर : 07 रिक्त जागा : 21

राष्ट्रवादी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
IPS अधिकारी रवी सिन्हा नवे RAW प्रमुख
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com