जे व्हायला नको होतं तेच झालं; काय म्हणाले अजित पवार?

जे व्हायला नको होतं तेच झालं; काय म्हणाले अजित पवार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात प्रत्येकाने थोडं तारतम्य ठेवून वागावं. सगळीकडे शांतताच राहिली पाहिजे. राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावं हा आमचा कायम प्रयत्न असतो. काल झालेल्या घटनेबाबत तपास यंत्रणा म्हणून पोलिस (Police) त्यांचे काम योग्य करतील. कायदा (Law) हातात घेण्याचं काम कोणीच करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला....

तसेच राष्ट्रपती राजवटीबाबत (President Rule) विरोधकांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न असे देखील पवार म्हणाले. पोलिस अकादमीच्या दीक्षांत समारंभानंतर ते नाशिक (Nashik) येथे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मुंबईमध्ये (Mumbai) एक खासदार आणि एक आमदार यांनी मातोश्रीला (Matoshri) येऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्याचा निर्णय घेतला. कोणी कुठे काय म्हणावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे हे भान ठेवायला हवे होते. काल झालेला हल्ला चुकीचाच होता. पण कोणीच कोणाला उचकवण्याचे काम करु नये.

राज्यातील पोलीस यंत्रणेकडून अनेकदा आम्हाला पण सांगितलं जातं की इकडे जाऊ नका वातावरण तंग आहे, तेव्हा आम्ही ऐकतो. पोलिसांनी (Police) त्यांना सांगितलं येऊ नका, पण ते आले. त्यांच्या खार च्या फ्लॅटवर ते थांबले. त्यामुळे जे व्हायला नको ते झालं व वातावरण वाढलं. तरी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले.

राज्यचे गृहमंत्री या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून होते. काही लोकांच्या भावना तीव्र झाल्या. मातोश्रीबद्दल आजच नाही, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असल्यापासून शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहे. त्यांचं दैवत म्हणून त्यांच्याकडे बघतात. राष्ट्रवादीच्या लोकांची शरद पवार (Sharad) साहेबांबद्दल, काँग्रेसच्या लोकांची सोनियाजींबद्दल, भाजपच्या लोकांची मोदींबद्दल हीच भावना आहे. पण जी घडली ती घटना घडायला नको होती.

पोलीस पोलिसांचे काम व्यवस्थित करतील सीसीटीव्ही कॅमेरे, मीडियाचे कॅमेरे होते. प्रत्येकाने थोडं तारतम्य ठेवून वागावं. सगळीकडे शांतताच राहिली पाहिजे. राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावं हा आमचा कायम प्रयत्न असतो तशी पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे. तपास यंत्रणा म्हणून पोलिसांचे काम ते करतील. कायदा हातात घेण्याचं काम कोणीच करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

Related Stories

No stories found.