
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा (assembly session) दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी कोरोनासंदर्भात (corona)बोलतांना अजित पवार (ajit pawar)गंभीर झाले. सदस्य मास्कचा वापर करत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, आपण प्रत्येकजण ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात बसतो. देशाचे पंतप्रधानदेखील कोरोना संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत. सध्या कोरोनाचं संकट गंभीर होत आहे. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. काही ठराविक सोडले तर सभागृहात अजिबात काही जण मास्क घालत नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घालतल्यावर बोलता येत नाही. परंतु बोलून झाल्यानंतरही मास्क लावलं पाहिजे. परदेशात दिड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आतात कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. मास्क न लावणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढा. मास्क घातला नाही तर कितीही कोणी प्रयत्न केला तर हे नियंत्रणात येणार नाही.