Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक आणि नागपूर मेट्रोला सर्वोतपरी मदत करू - अजित पवार

नाशिक आणि नागपूर मेट्रोला सर्वोतपरी मदत करू – अजित पवार

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक आणि नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन सार्वजनिक परिवहनाचे साधन विकसित व्हावे या उद्देशाने केंद्राकडून दोन्ही शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे…

- Advertisement -

या निधीमध्ये केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणि महापालिकेचा निधी असे वेगवेगळे भाग आहेत. यामध्ये राज्याच्या वाट्याला आलेला निधी राज्य सरकार देणार असून मेट्रो प्रकल्पासाठी सर्वोतपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी विभागातील जिल्ह्यातील वार्षिक नियोजनाच्या बैठका पार पडल्या. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मेट्रोला सर्वोतपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.

नाशिकमध्ये देशातला पहिला टायरबेस मेट्रोचा प्रकल्प साकारला जाणार आहे. केंद्राला या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडल्यानंतर केंद्राने हा प्रकल्प संपूर्ण देशभरात राबवला पाहिजे असे उद्गार काढून नाशिकच्या अनोख्या मेट्रोचे स्वागत केले होते.

नाशिकच्या मेट्रोसाठी अर्थसंकल्पात २ हजार ९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी मंजूर झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या