एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले...

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई | Mumbai

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरु असून शिंदे सरकार (Shinde Government) आणि राष्ट्रवादी (NCP) आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे...

काल मुखमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत आपल्या भाषणात बोलतांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांना करुणा शर्मा (Karuna Sharma) प्रकरणावरून 'तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही' असे म्हणत अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवर आता विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले की, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझे मत आहे की वैयक्तिक निंदा-नालस्ती कधीच कुणी कुणाची करू नये. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे, असे पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, इतर राज्यांमध्ये वेडेवाकडे प्रकार सभागृहात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खुर्च्या उचलणे किंवा काही ठिकाणी मारामारीही झाली आहे. पण अशा प्रकारच्या घटना आपण आपल्याकडे होऊ देत नाही. कारण सुरुवातीपासून वडीलधाऱ्यांपासून चालत आलेली परंपरा पुढेची चालत राहावी असे आम्हाला वाटते.

तसेच आम्ही सभागृहात जागृत राहून काम करत असतो. काही जण बोलता बोलता समोरून प्रतिसाद मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो. पण प्रत्येकानं बोलताना एक मर्यादा ठेवायला हवी. आपल्याकडून काही चूक होऊ देता कामा नये, असेही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com