… तर सरकारला ते शोभत नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सध्या चालू असून आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे…

त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता असून या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे.

…म्हणूनच आता स्त्रियांनी राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं

यावेळी पवार म्हणाले की, “आज देशासह जगभरात महिला दिन (women’s day) साजरा केला जात आहे. परंतु, एका गोष्टीची खंत वाटते की एवढा मोठा आपला महाराष्ट्र (Maharashtra) आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रीमंडळात एकही महिला नसणं हे कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही”, असे अजित पवारांनी सांगितले.

पाण्याचा फुगा बेतला जीवावर, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

पुढे पवार म्हणाले की, . “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) ६ ते ९ मार्च असा हवामान बदलाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अजूनही दोन दिवस नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *