Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले दंडुकेशाहीनं...

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले दंडुकेशाहीनं…

मुंबई | Mumbai

कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार (Govt) आणि आंदोलक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

- Advertisement -

या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र या आंदोलकांवर पोलिसांच्या बळाचा वापर केला जात असल्याचे येथील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे सरकारवर आता सर्व बाजूंनी टीका होत आहेत.

कोकणातील (Konkan) राजापूर येथील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्पासाठी होत असलेल्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ बायकामुलांसह रस्त्यावर उतरले आहेत. भर उन्हातान्हात रस्त्यावर लोळण घेऊन प्रशासनाला विरोध करत आहेत.

यामुळे कोकणात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा (Vidhansabha) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडत बारसूतील सर्वेक्षण त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे कमबॅक

अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून बारसूतील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

विमानाला पक्षी धडकला, इंजिनला आग, प्रवाशांचा जीव टांगणीला; थरकाप उडविणारा Video Viral

राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आपल्या भूमिकेत म्हटले आहे.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! फडणवीस-शिंदेंमध्ये पदाची अदलाबदली होणार?

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी (police) बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका. सर्वेक्षण त्वरित स्थगित करा, अशी मागणी अजित पवार यांनी याप्रश्नी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या