Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

पुणे | Pune

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकदिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर मोदींच्या हस्ते मेट्रोच्या मार्गिकेचंही लोकार्पण केलं आहे.

- Advertisement -

या दरम्यान एमआयटी महाविद्यालयात मोदींची जाहीर सभा झाली. या जाहीर सभे दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचंही भाषण झालं. यावेळी बोलताना अजित पवारांनी भरसभेत राज्यपालांचे (Bhagat Singh Koshyari) नाव न घेता टोला लगावला.

अजित पवार यावेळी बोलतांना म्हणाले की, पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत.

तसेच, ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो. असं आजी पवार यांनी म्हंटल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या