Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याज्यांना स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, त्यांनी...; अजितदादांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

ज्यांना स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, त्यांनी…; अजितदादांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून मागील वेळेस थोड्या जागांवर पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत.

- Advertisement -

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीचाही समावेश आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये (NCP and BJP) संघर्ष पेटण्याची चिन्हे असून आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत एक लाख मतांनी भाजपचा उमेदवार बारामतीतून निवडून येईल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

पवार म्हणाले की, बावनकुळे नुसत्या गप्पा मारायचे काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते ही यांची विश्वासार्हता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या, मी खंबीर आहे, असा सणसणीत टोला त्यांनी बावनकुळेंना लगावला.तसेच भाजपला महागाईवर बोलता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही, भाजप लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात (Maharashtra) अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदारसंघ मिळतोय का बघतो, कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसे चालेल, मी त्यांनाच विचारणार आहे की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का जिथे आम्ही निवडुन येऊ शकतो, असे म्हणत पवारांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या