विधानभवन राडा प्रकरणी पवारांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले,आमच्या...

विधानभवन राडा प्रकरणी पवारांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले,आमच्या...

मुंबई | Mumbai

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरु असून आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर आंदोलन करत होते.

त्यानंतर आज शिंदे गटातील आमदारांनी (Shinde Group MLA) थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. मात्र, आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे. आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांना झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० खोके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, 'चोराच्या मनात चांदणं' असा हा प्रकार आहे असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com