Samruddhi Mahamarg : अजित पवारांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले...

अजित पवार
अजित पवार

पुणे | Pune

समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सकाळी नागपूरमध्ये (Nagpur) दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते जपळपास ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्यातील विधानसभा व विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. पंरतु, ते अनुउपस्थित राहिले. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी समृद्धी महामार्गाच्या श्रेयवादावरून सरकारवर निशाणा साधला आहे....

ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग माझं नाही. पण मला आमंत्रण आले आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणार आहे. वेळ कमी होणार आहे. पुढचा टप्पा लवकर होण्याकरता काम सुरू आहे. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका ब्रिजचे काम राहील त्यामुळे नाही करता आले. या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. काही अडचणी आहेत पण होईल सगळे काम, मोठा रस्ता होतो, असे पवारांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, समृद्धीचे श्रेय घेण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा असेल असे मला काही वाटत नाही. कारण दोघांनी एकत्रच पंतप्रधानांना आमंत्रण दिले. दोघांनी एकत्रच रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी ड्रायव्हिंगचे काम देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारले होते. त्यात गाडीचा वेगही १५० पर्यंत होता. गाडी कुणाची वगैरे हा वेगळा विषय आहे, असे म्हणत अजित पवारांनी या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना कोपरखळी मारली.

तसेच काल मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांच्यावर झालेल्या शाईफेकबाबत बोलतांना पवार म्हणाले की, कोणी मोठी व्यक्ती असली की त्याला एक्स वाय सुरक्षा दिली जाते. कुठल्या व्यक्तीवर अशी शाईफेक करू नये,वैचारिक मतभेद असतील. पण कायदा हातात कोणी घेऊ नये. आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही. शाल जोडीतील शद्ब वापरता येतात पण कालची गोष्ट चुकीचीच होती. आपण बोलतांना महापुरुष बोलून टाळले पाहिजे, बोलतांना तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्लाही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com