
मुंबई | Mumbai
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाषणावर स्पष्टीकरण दिले आहे.
संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
तसेच शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणार, असंही अजित पवार यांनी म्हंटल आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदरांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.