Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचे मोठे विधान

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचे मोठे विधान

पुणे | Pune

भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे निवडणूक विभागाने याबाबत संपूर्ण तयारी केली असून तातडीने निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठे विधान केले आहे…

- Advertisement -

अजित पवार हे आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी टिंबर मार्केटला भेट देऊन तिथे लागलेल्या आगीने (Fire) झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर भाष्य केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “मला एक बातमी अशी पण कळली की, मला वाटत होते की लोकसभेच्या निवडणूकीला एकच वर्ष राहीलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे.” असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “निवडणूक लागल्यानंतर ज्या मित्रपक्षांपैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं? वजन करायचं का? तर नाही. त्यासाठी मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. आमदारकीच्या निवडणूकीत कोणाला किती मते पडली याची माहिती घेतल्यानंतर अंदाज येतो” असेही अजित पवार म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या