अजित पवारांचा भाजप आमदारांच्या बंडासंदर्भात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा ८०-८५ जण...

अजित पवारांचा भाजप आमदारांच्या बंडासंदर्भात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा ८०-८५ जण...

मुंबई | Mumbai

कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली आहे. राज्यपालांनी काल आपल्या अभिभाषणात मराठा समाजासाठी (Maratha Community) राज्य सरकारच्या विशेष योजना, राज्यात ७५ हजार युवकांसाठी नोकरी भरत्या. जानेवारी २०२३ मध्ये १ लाख ३५ हजारांच्या गुंतवणुकीचे करार, जुन्या पेन्शन योजनेत बदल, अशा राज्य सरकारच्या विविध कामांचा लेखाजोखा पटलावर ठेवला. त्यानंतर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अभिभाषणावर बोलताना भाजपवर (BJP) जोरदार हल्ला करत मोठा गौप्यस्फोट केला आहे...

अजित पवारांचा भाजप आमदारांच्या बंडासंदर्भात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा ८०-८५ जण...
...अखेर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ; लढ्याला मोठे यश

यावेळी पवार म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर झालं तेव्हा सगळ्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असं वाटत होतं पण काय झालं? भाजप आमदारांना बंड करायचं होतं, पण देवेंद्र फडणवीस बोलले वरून आदेश आहेत, असं काही करू नका. वरच्या दोन माणसांना कळलं तर काही खरं नाही. तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही आपण भेटलो तेव्हा त्यांनीही हे काय झालं? असा प्रश्न मला विचारला. फडणवीस म्हणाले मी मंत्रिमंडळात जाणार नाही, यानंतर कुणाच्या डोळ्यात पाणी आलं हे आपल्याला माहिती आहे असे म्हणत त्यांनी गिरीश महाजनांना (Girish Mahajan) टोला लगावला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अजित पवारांचा भाजप आमदारांच्या बंडासंदर्भात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा ८०-८५ जण...
ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण; वाचा कोर्टात नेमकं काय घडलं?

पुढे ते म्हणाले की, तेव्हा ८०-८५ जण (आमदार) म्हणत होते की, आपण बंड करायचं का? शेवटी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असं काही करू नका. त्या दोघांना कळलं तर आपला सगळा सुफडा साफ होईल, गप्प बसा. सगळ्यांनी गपगुपानं ऐकलं. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात (Graduate And Teacher constituencies) तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. बालेकिल्ल्यातही तुमचा पराभव झाला. ६-८ महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधर आणि शिक्षकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तरी दुसऱ्यांवरच डोळा. तुमचे करा ना तयार, समोर बघितलं तर ४०-५० जण आपल्यातलेच गेले आहेत. ही अवस्था आहे, असे अजित पवारांनी भाजपला (BJP) उद्देशून म्हटले.

अजित पवारांचा भाजप आमदारांच्या बंडासंदर्भात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा ८०-८५ जण...
कांदा मुद्द्यावरून विधानसभेत घमासान; भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com