अजित पवार, उदय सामंतांचा नाशिक दौरा रद्द

अजित पवार, उदय सामंतांचा नाशिक दौरा रद्द

नाशिक | Nashik

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांचा नाशिक जिल्ह्याचा दौरा अचानक रद्द झाल्याने सर्वत्र चर्चा होत आहे...

विरोधी पक्षनेते अजित पवार हे कर्मवीर काकासाहेब वाघ (Karmaveer Kakasaheb Wagh) सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाला उपस्थित राहणार होते. तसेच पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेस देखील ते भेट देणार होते. पंरतु त्यांचा आजचा हा नियोजित दौरा अचानक रद्द झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या दौऱ्यातील हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याचे समजते. तसेच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तर उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील आज नाशिक दौऱ्यावर येणार होते. पंरतु त्यांचाही दौरा (Tour) अचानक रद्द झाला आहे. सामंत हे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर म.औ.वि.मं. अंबड (Ambad) येथे पाहणी करणार होते.

तसेच उद्योग विभागाची आढावा बैठक घेऊन विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करणार होते. त्याचबरोबर सामंत हे विविध कार्यक्रमांना हजेरी लावून सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार होते. सामंत यांचा हा दौरा नेमका कशामुळे रद्द झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com