Video : 5G च्या स्पर्धेत एअरटेलची आघाडी

आता सध्यापेक्षा दहा पट वेग मिळणार
एअरटेल 5G
एअरटेल 5G

हैदरबाद

5G च्या स्पर्धेत रिलायन्स जियोला मागे टाकत भारती एअरटेलने आघाडी घेतली आहे. एअरटेल आपली 5G इंटरनेट सेवा लाईव केली आहे. भारतात 5G ची चाचणी करणारा एअरटेल पहिला टेलिकॉम ऑपरेटर झाला आहे. आतापर्यंत अन्य कोणत्याही कंपनीने भारतात 5G सर्विसेसला टेस्ट केलेले नाही.

एअरटेल कंपनीने आपल्या युट्यूब पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. Airtel 5G सर्विस हैदराबादमध्ये कर्मशियली लाइव केली आहे. कंपनीच्या CEO चे म्हणणे आहे की, स्पेक्ट्रम अलॉटमेंटसह Airtel 5G सर्विस सुरु केली जाऊ शकते. 1800 मेगाहर्ट्ज बैंड NSA (Non Stand Alone) नेटवर्क टेक्नोलॉजीत ही चाचणी झाली आहे.

कंपनीने या 5G सेवेला डायनॅमिक नेटवर्क स्पेक्ट्रम शेअरिंग टेक्नोलॉजीसह टेस्ट केले आहे. कंपनीने असा दावा केले आहे की, एअरटेल भारतामध्ये 5G नेटवर्क ला टेस्ट करणारी पहिली टेलिकॉम प्रोवाइडर कंपनी ठरली आहे. त्यामुळे एअरटेलचे हे एक यशस्वी पाऊलच म्हणावे लागेल.

वेग दहा पट असणार

एअरटेलचे 5G सर्विसचा स्पीड हा 4G पेक्षा 10 पट जास्त असेल. हैदराबादमध्ये हा स्पीड तपासणाऱ्या एअरटेल कंपनीने असा दावा केला आहे की, या 5G नेटवर्कवर तुम्ही पुर्ण लेन्थ HD चित्रपट डाऊनलोड करु शकता. यात 3Gbps पर्यंत डाउनलोडिंग स्पीड मिळू शकते. एअरटेल आपल्या 5G सेवा हैदराबादच्या माधवपूर Airtelk Store मध्ये देत आहे. यूजर तेथे भेट देऊन Airtel 5G सेवेचा अद्भूत अनुभव घेऊ शकतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com