Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशउद्यापासून का महागणार विमानप्रवास, जाणून घ्या...

उद्यापासून का महागणार विमानप्रवास, जाणून घ्या…

नवी दिल्ली:

तुम्ही विमान प्रवास करत असाल तर १ एप्रिलपासून तुमच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने देशांतर्गत प्रवासासाठी ४० रूपयांची वाढ केली आहे.

- Advertisement -

१ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. विमानतळ सुरक्षा फी वाढल्यामुळे आपली हवाई तिकिटे महाग होतील. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हवाई तिकिटांमध्ये विमानतळ सुरक्षा फी वाढविली. विमानतळ सुरक्षा शुल्कासाठी स्थानिक प्रवाशांकडून २०० रुपये घेण्यात येणार आहे. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागतील. २ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारक, ऑन ड्युटी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सचा यांना या सुरक्षा फीमधून सुट देण्यात आली आहे. देशांतर्गत हवाई प्रवासासाठी प्रवाशांचे भाडे ४० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ११४.३८ रुपये द्यावे लागतील.

दर सहा महिन्यांनी वाढ

विमानतळ सुरक्षा शुल्क दर ६ महिन्यांनी सुधारित केले जाते. सप्टेंबर २०२० मध्ये विमानतळाची सुरक्षा फी १६० रुपये केली. म्हणजे त्यात १० रुपयांनी वाढ केली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ते ४.९५ डॉलरवरुन ५.२० डॉलरपर्यंत केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या