भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाशिक | Nashik

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (BJP and NCP) फारसे चांगले संबंध नसल्याचे जाणवून येत होते, मात्र नुकत्याच नागालँडमध्ये (Nagaland) पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिल्याने भाजप आणि राष्ट्रवादीचे सख्य असल्याच्या टीका होत होत्या. मात्र अलीकडे या पक्षातील दोन प्रमुख नेत्यांनी एकत्र हवाई प्रवास केल्याने पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा रंगल्या आहेत...

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमान प्रवास केला. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
... तर, आम्ही स्वतंत्र लढू; 'या' नेत्याने भाजपला दिला थेट इशारा

नांदेडमध्ये देखील गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी तातडीने लातूर आणि नांदेड (Nanded) दौऱ्यावर जायचे होते. दरम्यान, शनिवारी माजी मंत्री छगन भुजबळ विमानाने अन्य एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे कळल्यानंतर मंत्री गिरीश महाजनही त्याच विमानाने आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

विशेष म्हणजे भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. दरम्यान,"आमचा एकत्र प्रवास म्हणजे निव्वळ एक योगायोग होता असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा एकत्र हवाई प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सचिन तेंडूलकर म्हणाले ; माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानातच
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com