दिल्ली, चेन्नई, कोलकातासाठी नाशिकहून हवाईसेवा?

विमान कंपनींकडून चाचपणी सुरू
दिल्ली, चेन्नई, कोलकातासाठी नाशिकहून हवाईसेवा?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमधून कोलकातासाठी विमानसेवा Airlines from Nashik to Kolkata सुरू करण्याच्या अनुषंगाने एका विमान कंपनीने नुकतीच नाशिक विमानतळावर भेट देत चाचपणी केली. तसेच उद्योजकांशीही संवाद साधल्याचे वृत्त आहे. या विमान कंपनीद्वारे दिल्लीसह चेन्नई, कोलकातासाठी विमानसेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे समजते Airlines for Delhi, Chennai, Kolkata from Nashik.

नाशिक विमानतळ हे केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत समाविष्ट असून येथून सुरू असलेल्या अहमदाबाद, पुणे, बेळगाव, दिल्ली या विमान सेवांना किमान 40 टक्के आसने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिली जात आहेत.

शिर्डी विमानतळावर उडान योजना नसल्याने व्यावसायिक दर आकारण्यात येतात. त्यामुळे सवलतींचा लाभ घेण्यासाठी शिर्डीला येणार्‍या पर्यटकांसह जळगाव, नंंदुरबार, धुळे येथून औरंगाबाद विमानतळाहून जाणारे प्रवासीदेखील आता नाशिकला पसंती देत आहेत.

यामुळे विमान प्रवाशांची संख्या नाशिक विमानतळावर वाढताना दिसून येत आहे. येत्या मार्च महिन्यात नाशिकहून स्पाइसजेट विमान कंपनीद्वारे बंगळुरू, हैदराबाद, गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

नाशिकहून मिळत असलेला प्रवासी प्रतिसाद लक्षात घेत इतर विमान कंपन्यादेखील या विमान तळावरुन सेवा देण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com