जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन

जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन

अहमदनगर | Ahmednagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यविधी होणार आहे. 

अ‍ॅड. उदय शेळके यांनी जीएस महानगर बँकची धुरा समर्थपणे सांभाळली. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अ‍ॅड. उदय शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

महानगर बँकेतील त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच त्यांना ही संधी देण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम केले. एकाच वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बलाढ्य बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com