मुख्य बातम्या
Video : ...अखेर कृषीमंत्री अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
निफाड | Niphad
राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला असून उभ्या पिकांना फटका बसलाच आहे. तसेच अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेली पिकेदेखील जमीनदोस्त झाली आहेत.
हातातोंडाशी आलेले पिक पावसाच्या संकटामुळे बेचिराख झाले. केलेला खर्चही फिटणार नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निफाड तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. पाहा व्हिडीओ....