नाशकात कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनच ५० कोटींचा घोटाळा

नाशकात कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनच ५० कोटींचा घोटाळा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतकऱ्यांसाठी (Farmers) असलेल्या योजनांच्या (scheme) माध्यमातून विविध विकासकामे (Development work) करताना कृषी विभागाच्या (Agriculture Department) अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमताने जवळपास ५० कोटींचा भ्रष्टाचार (Corruption) केल्याची घटना नाशिकमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी पेठ तालुका पोलीस ठाण्यात (Peth taluka police station) १६ अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत योगेंद्र ऊर्फ योगेश सुरेश सापटे (Yogendra Sapte) (रा. हेदपाडा, एकदरे, ता. पेठ, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटल्यावर, संशयित आरोपी नरेश शांताराम पवार, दगडू धारू पाटील, संजय श्यामराव पाटील, विठ्ठल उत्तम रंधे, दीपक पिराजी कुसळकर, दिलीप ज्ञानदेव फुलपगार, कृषी पर्यवेक्षक दिलीप औदुंबर वाघचौरे (रा. सोलापूर), मुकुंद कारभारी चौधरी (रा. उंबरी), किरण सीताराम कडलग (रा. जवळे कडलग), प्रतिभा यादवराव माघाडे (रा. दिंडोरी), राधा चिंतामण सहारे (रा. सुरगाणा), कृषी अधिकारी विश्‍वनाथ बाजीराव पाटील (रा. परधाडे), अशोक नारायण घरटे (रा. साक्री, जि. धुळे), एम. बी. महाजन (रा. पेठ), सरदारसिंग उमेदसिंग राजपूत (रा. चाळीसगाव) व शीलानाथ जगन्नाथ पवार (रा. मानूर) यांनी संगनमत करून सन 2011 ते 2017 या कालावधीत शासनाच्या (Government) विविध योजना मंजूर करून व निविदा काढून घेतल्या.

फिर्यादी सापटे व साक्षीदारांकडून निविदा भरून घेत शंभर रुपयांच्या कोर्‍या स्टॅम्प पेपरवर तिकीट लावलेल्या 50 कोर्‍या पावत्यांवर, कोर्‍या चेकवर सह्या घेऊन त्यांचा गैरवापर केला, तसेच खोटी कागदपत्रे बनवून, खोटे दस्तऐवज नोंद करून फिर्यादी सापटे व साक्षीदारांच्या नावाने परस्पर 3 कोटी 17 लाख 4 हजार 504 रुपयांची रोकड काढून घेतली.

त्याचप्रमाणे नमूद कालावधीत पेठ तालुक्याकरिता (Peth Taluka) मंजूर विविध योजनांचे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपये परस्पर वापरून लाभार्थी व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली.

याबाबतची फिर्याद सापटे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ यांच्या न्यायालयात (Court) दाखल केल्यानुसार दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग, न्यायाधीश यांच्याकडे फौजदारी चौकशी अर्जानुसार पेठ पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com