Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणूक: प्रारूप यादी होणार प्रसिद्ध

कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणूक: प्रारूप यादी होणार प्रसिद्ध

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committees) नुवडणुकीचा (election) बिगुल वाजला असून सोमवारी (दि.२७) प्रारूप यादी प्रसिद्ध होणारआहे.

- Advertisement -

यामुळे आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्र (Co-operative sector) ढवळून निघणार आहे. प्रारूप यादीवर हरकती, सुनावणीची प्रक्रिया होऊन २० मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर, साधारणता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मतदान (voting) होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नाशिकसह १३ बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची (Board of Directors of Market Committee) मुदत संपुष्टात येऊन तब्बल २० महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे निवडणुका (election) लांबणीवर पडल्या आहेत. नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, सिन्नर, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या समित्यांच्या संचालक मंडळाची आता निवडणूक (election) होऊ घातली आहे. या समित्यांवर सध्या प्रशासक कार्यभार पाहत आहेत. ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्यांचा समावेश करून नव्याने याद्या करण्याचा आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (Election Authority) सहकार विभागाला (Cooperative Department) दिला आहे. त्यानुसार नवीन याद्या मागविल्या आहेत.

या सुधारित याद्या शुक्रवारी (दि. २४) संबंधित बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे (District Deputy Registrar Office) सादर झालेल्या आहेत. या प्रारूप याद्या सोमवारी (दि.२७) प्रसिद्ध होतील. त्यानंतर त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया होऊन २० मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारंभी करोना काळामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने संचालक मंडळाला मुदतवाढ दिली होती. त्यानंतर राज्यात सत्तातंर झाल्यानंतर, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना उमेदवारी, तसेच मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकराने घेतली होती.

बाजार समिती अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करणारे विधेयक सरकारने मांडले होते. ते विधेयक अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम (Election program) स्थगित झाला होता. दरम्यानच्या काळात समित्यांची सूत्रे संचालक मंडळाकडून प्रशासकांकडे गेली. निवडणुका घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या होत्या.

अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकांवरील स्थगिती उठवत 30 एप्रिलअखेर राज्यातील सर्वच समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार, सहकार प्रधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषीत केला. यात अंतिम मतदार यादी 20 मार्च रोजी प्रसिध्द होईल. अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर, सहकार प्रधिकरणाकडून मतदानाच्या तारखा घोषीत होतील. 15 ते 20 एप्रिल दरम्यान, बाजार समित्यांसाठी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंतिम यादीचा कार्यक्रम असा

  • प्रारूप प्रसिद्ध : २७ फेब्रुवारी

  • हरकती : २७ फेब्रुवारी ते ८ मार्च

  • सुनावणी व निर्णय : १७ मार्च

  • अंतिम यादी : २० मार्च

- Advertisment -

ताज्या बातम्या