मराठा आरक्षण: मेटेंकडून ठाकरे, चव्हाणांवर 'हा' मोठा आरोप

६ ऑगस्टपासून आंदोलन
विनायक मेटे
विनायक मेटे

नाशिक । प्रतिनिधी

सत्ताधारी ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. ठाकरे व अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असुन आरक्षणाबाबत त्यांच्या मनात पाप असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा मराठा आरक्षण समितीचे सदस्य विनायक मेटे यांनी केले.

अशोक चव्हाण निष्क्रिय असून एकनाथ शिंदे यांना समितीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी (दि.३) पत्रकार परिषद घेउन मेटे यांनि मराठा आरक्षण समन्वय समितीची पुढिल दिशा स्पष्ट केली. नऊ संघटनांनी एकत्र येऊन मराठा समनव्य समिती स्थापन केली आहे.

ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल. त्यामुळे येत्या ६ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बैठकीत सांगतात सरकारची सर्व तयारी झालेली आहे. पण दुर्दैवाने शासनाचे वकील सांगतात की आमची तयारी झालेली नाही. याचा अर्थ ठाकरे सरकार आणि अशोक चव्हाण सांगता वेगळं आणि वागत वेगळं. हे सरकार समाजाशी खोटं बोलत आहे, असा आरोप त्यांनी केला.

अनुभवी वकिलांना बाजूला केले जात आहे. सरकार मधलेच काही लोक विरोधातील लोकांना मदत करत आहेत.

अशोक चव्हाण आरक्षणाचा अभ्यास करत नाहीत. ते आरक्षण प्रश्नी गंभीर नाहीत. नाकाम आणि निष्क्रिय असलेल्या अशोक चव्हाण यांना जबाबदारीतून मुक्त करावे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी.

मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांच विशेष अधिवेशन घेण्यात यावे. ५० टक्क्यांचे सिलिंग तोडून ज्यांना आरक्षण दिल त्यांच्या सोबत मराठा आरक्षण एकत्रित करण्यात यावा अशी मागणी राज्याने सर्वोच्च न्यायालयात करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

येत्या ६ ऑगस्टला जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील कार्यालयांमध्ये निवेदन दिले जाईल. ७ ऑगस्टला राज्यातील सर्व आमदार, खासदारांना पत्र दिले जाईल. त्यानंतर लाखो लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना फोन करून मागणी करावी. ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या औचित्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com