Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामहागाईविरोधात एल्गार

महागाईविरोधात एल्गार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महागाई( Inflation ), बेरोजगारी ( Unemployment )विरोधात डावे पक्ष आज पासून मैदानात उतरणार असून 31 मे पर्यंत त्यांचा एल्गार सुरु राहणार आहे.

- Advertisement -

जनतेची दैन्यवस्था करणार्‍या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध डाव्या पक्षांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करावे, अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे.

काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले-लिबरेशन) यांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आजपासून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांवर जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीत डॉ. अशोक ढवळे, डॉ.उदय नारकर, डॉ. एस. के. रेगे, भाकपचे तुकाराम भस्मे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, सुभाष लांडे, शेकापचे राजू कोरडे, लानिपचे भीमराव बनसोड, राजेंद्र बावके आणि भाकप (माले) ‘लिबरेशन’चे श्याम गोहिल व अजित पाटील यांनी केले.

या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती आदी सहभागी होत आहेत.

पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये (value added tax on petrol and diesel) अनुक्रमे 2.08 रुपये व 1.44 रुपये कपातीचा गाजावाजा करून ठाकरे सरकारने जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल – डिझेल वरील करातही तातडीने 50 टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे( BJP Yuva Morcha ) बुधवारी (दि.25) दुपारी बाराला रविवार कारंजा येथे एल्गार आंदोलन केले जाणार आहे.

पेट्रोल, डिझेल वरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याची केवळ घोषणा न करता त्याबाबतचा शासन आदेश (जीआर) काढावा, केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसर्‍यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिल्यावर ठाकरे सरकारने दीड ते दोन रुपये कपात करून राज्यातील जनतेची क्रूर चेष्टा केली.

महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे 32.55 रुपये तर डिझेलवर लिटरमागे 22.37 रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते. केंद्र सरकारने कर कपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत, म्हणुन हे आंदोलन होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या