Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकिसान सभेचा पुन्हा एल्गार; पुकारला राज्यव्यापी पायी मोर्चा

किसान सभेचा पुन्हा एल्गार; पुकारला राज्यव्यापी पायी मोर्चा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर किसान सभेतर्फे दि.२६, २७, २८ रोजी अकोले ते लोणी (जि. अहमदनगर) असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

अखिल भारतीय किसान सभा (All India Kisan Sabha), सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना, तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.

…सरकार पडणार नाही; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का

मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे, असा इशारा किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे (Dr. Ashok Dhavale), जे. पी. गावित (J. P. Gavit), उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, किसन गुजर, सुभाष चौधरी, चंद्रकांत घोरखाना, संजय ठाकूर, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे यांनी दिला आहे.

Sharad Pawar : शरद पवारांचा ‘त्या’ विधानावरून यू टर्न? म्हणाले, माझ्या वक्तव्याचा…

या मागण्यांसाठी एल्गार…

दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यांसारख्या पिकांना रास्त भावाची हमी, दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध, जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला, शेतकऱ्यांना व निराधारांना पेन्शन, सर्वांना घरकुले, कर्ज व वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम व घरकुल तसेच आशा कर्मचारी, आशा सुपरवायझर, अंगणवाडी ताई, पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्त्री परिचर, घरेलू कामगार यांचे प्रश्न. या मागण्यांसाठी एल्गार ( Elgar) पुकारण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या