'त्या' यू-टर्नवर पुन्हा अपघात; ऑईल टँकर उलटला

टँकर चालक जखमी
'त्या' यू-टर्नवर पुन्हा अपघात; ऑईल टँकर उलटला

पेठ । प्रतिनिधी Peth

नाशिक - पेठ राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik - Peth National Highway)वारंवार अपघात घटणारे अपघाती यु वळणावर आज दि.(१६) रोजी गुजरात सिल्वासा येथुन ऑईल घेऊन नाशिककडे जाणारा टँकर क्रमांक जी जे १५ वाय वाय २९९९ हा या वळणावर उलटला असुन परिसरात ऑईल पसरले आहे.

अपघातात टँकर चालक जीतलाल सुरेशकुमार पाल (२४) रा. प्रतापगड उत्तर प्रदेश हा जखमी झाला असून त्याच्यावर पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मागील आठवड्यात याच ठिकाणी खाद्य तेल वाहतुक करणारा मालट्रक उलटून खोलवर तीस ते चाळीस फुट दरीत जाऊन कोसळला होता. मात्र हा टँकर येथील काँक्रिटच्या संरक्षक भिंतीस अडकल्याने मोठा अपघात ठळला होता

दरम्यान आजच्या अपघातात टँकर पलटी होऊन रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे .दुचाकी चालकांची घसरघुंडी सुरू झाली असुन संबधित प्रशासनाने यावर तात्काळ उपाय योजना करावी अन्यथा हे अपघातास कारणीभूत ठरेल असा सुर नागरिकांतुन निघत आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वरील कोंटबी घाटातील या अपघाती वळणावर वारंवार अपघाताची मालिका सुरूच असुनही महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करिता असल्याने वाहन चालक व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोटंबी घाटातील ( Kotambi Ghat )या अपघाती वळणा बाबत अनेकदा महामार्ग प्रशासनाशी पत्र व्यवहार केला असुन या वरती कोणतीच ठोस उपाय योजना संबंधित प्रशासन करत नसून आता या बाबत मोठे जनआंदोलन छेडले जाईल असे कोटंबी ग्रामपंचायतीचे सरपंच किरण भुसारे यांनी सांगितले. नेमके अपघातप्रवण क्षेत्रातच ऑईल पसरल्याने वाहनांच्या अपघाताचा धोका वाढलेला असतांना विशेषता : दुचाकीस्वारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असतांन पर्यायी रस्त्याची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने धोका पत्करूण प्रवास करणे धोकादायक झाले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com