Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकाळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर भारतात आता हे नवीन संकट

काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर भारतात आता हे नवीन संकट

नवी दिल्ली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. काळ्या, पांढऱ्या बुरशीचा सामना भारताला करावा लागत असतांना देशात प्रथमच नवीन आजार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये (Ghaziabad) प्रथमच पिवळ्या बुरशीचा (yellow fungus ) रुग्ण सापडला आहे आणि तो पांढऱ्या व काळ्या बुरशीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

राज्यातील लॉकडाऊन वाढणार का ? आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

भारताने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वी सामना केला. त्यानंतर दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती विदारक झाली. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना करावी लागणारी धडपड, ही सर्व संकटांना देशातील नागरिकांना सामोरे जावे लागले. त्यात मृत्यूदर वाढला.

कोरोनानंतर काळ्या आणि पांढऱ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या देशात वाढत आहे. आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला आणि ही बुरशी अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. गाझीयाबादमध्ये कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉक्टर बिरज पाल त्यागी यांनी पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला असल्याचे सांगितले. त्यांनी या रुग्णावर उपचार सुरु केले आहे.

काय आहे लक्षणे

१)भूक कमी लागणे, वजन कमी होणे, सुस्तपणा

२) पू ची गळती आणि जखम लवकर न भरणे, कुपोषण, अवयव निकामी होणे, डोळे येणे

का होतो हा आजार

अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शिळे अन्न खाऊ नये. घरातील दमटपणाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अधिक दमट वातावणामुळे बुरशी होण्याचे संकट वाढते.

उपचार काय?

पिवळी बुरशी हा प्राणघातक रोग आहे. यामुळे त्यावर त्वरीत उपचार करणे आवश्यक आहे. या रोगावर केवळ Amphotericin B injection ( अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन) ही औषधच उपचार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या