Photo Story कोरोनाला आमंत्रण: विकेंड लॉकडाऊन संपताच नाशिककर रस्त्यावर

Photo Story कोरोनाला आमंत्रण: विकेंड लॉकडाऊन संपताच नाशिककर रस्त्यावर

सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे

दोन दिवस शिस्तीने राहिलेल्या नाशिकरांचा संयम सोमवारी सुटला. पाडव्याच्या पुर्वसंध्येला कोरोनाला विसरत नाशिककर रस्त्यावर आले. मग मास्क, सोशल डिस्ंटन्सिंग या सर्वांची तिरंजली देते कोरोनाला आमंत्रण दिले गेले.

कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीचा वेग वाढतो आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसत आहे.

त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले. भाजीपाला, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.

नाशिकमध्ये शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन झाल्यानंतर सोमवारी बाजारात मोठी गर्दी झाली. यावेळी सोशल डिस्टंन्सिंग तसेच मास्क वापरणे या नियमांना नागरिकांनी धाब्यावर बसवले.

आवश्यक वस्तू खरेदी करण्याबरोबरच अनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.

रविवार कारंजा, बोरपट्टी, दगडू तेली गल्ली, अशोक स्तंभ, पंचवंटी कारंजा आदी परिसरात मोठी गर्दी झाली. यामुळे शनिवारी, रविवारी निर्मनुष्य असणारे हे रस्ते आज गर्दीने फुलून गेले.

काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. परंतु गर्दीला आवरण्यासाठी प्रशानसाकडून काहीच उपाययोजना झाल्या नाहीत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com