Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यादोन वर्षानंतर भाविकांना मिळणार उटी ; भाविक त्रंबक नगरीत दाखल

दोन वर्षानंतर भाविकांना मिळणार उटी ; भाविक त्रंबक नगरीत दाखल

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे | Trimbakeshwar

आज एकादशी (Ekadashi) श्री संत निवृत्तीनाथांच्या (Shri Sant Nivruttinath) उटीवारीसाठी त्रंबक नगरीत (Trimbakeshwar) पंचवीस हजार भाविक दाखल झाले आहेत. यात पायी आलेल्या दहा बारा दिंड्या मधून पाच हजार वारकरी (Warakari) दाखल झाले आहेत.

- Advertisement -

आज ही दिवसभर वारकरी येतील. एकाच ठिकाणी गर्दीचा लोड येऊ नये म्हणून तीन ठिकाणी उटी वाटप केंद्रे करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे (Police Inspector Sandeep Ranadive) यांनी दिली. मंदिर पूर्व दरवाजावर समोरासमोर दोन ठिकाणी तसेच पश्चिम दरवाजाजवळ उटी वाटप होईल. दुपारी संत निवृत्तीनाथांच्या समाधीस महापूजने उटी लावण्यात येईल व रात्री पूजेने, कीर्तनाने उटी उतरवून भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येईल माहिती शासन समितीचे अड भाऊसाहेब गंभीरे यांनी दिली.

दोन वर्षानंतर भाविकांना मुक्त दर्शन तसेच उटी प्रसाद घेण्यास मिळणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वारीच्या दिवशी दर्शनासाठी एकेरी रांग लावण्यात येणार असून उटी वाटप रांगेने होत आहे. आज मोठी गर्दी होणार हे निश्चित झाल्याने मंदिर रस्त्याकडे वाहने येऊ नये म्हणून तीन ठिकाणी तर मुख्य मंदिर चौकात एक ठिकाणी बॅरीकेटिंग (Barricading) करण्यात आले असून पादचारी मार्गाची कोंडी होणार नाही यावर भर देण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत जादा बसेसची सोय एसटी महामंडळाने (ST Corporation) करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासन (Taluka administration) आणि नगरपालिका (Municipality) यांनी लक्ष घालने गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या