Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यारथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून 'ही' विशेष मोहीम

रथोत्सव मिरवणुकीनंतर मनपाकडून ‘ही’ विशेष मोहीम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेतर्फे पंचवटीत (panchavati) श्रीराम रथोत्सव मिरवणूकीसाठी (Shri Ram Rathotsav Procession) मोठ्या प्रमाणात जनसागर लोटला होता.

- Advertisement -

त्यामुळे शहरातील रस्त्यांवर घाण वाढल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर मनपातर्फे या मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign) राबवण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या आदेशाने

आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग (Department of Solid Waste Management) संचालक डॉ. कल्पना कुटे (Director Dr. Kalpana Kute) यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता करण्यात आली. रथोत्सव मिरवणूक सोहळा पार पडल्यानंतर या मार्गावर पसरलेला कचरा संकलीत करुन तात्काळ घंटागाडी मार्फत उचलून घेण्यात आला आहे.

या स्वच्छता मोहिमेत श्री काळाराम मंदिर, नागचौक, काट्यामारुती चौक, गणेशवाडी मार्गे, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, रामकुंड आदी परिसरातील श्रीराम रथ मिरवणूक मार्गावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता करण्यात आली. यात खाद्य पधार्थांचे पाकीट;े फूलांच्या पाकळ्या रांगोळी, लोकांचे पडलेले टोपी रुमाल व इतर साहीत्य सापडले.

सदर स्वच्छता मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उदय वसावे, दीपक चव्हाण, स्वच्छता निरीक्षक किरण मारू, मुकादम बाळु पवार, चंद्रशेखर साबळे, दिनेश सोलंकी, नरेश नागपुरे, निलेश गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावटे, संजय जमधाडे आदींसह 70 स्वच्छता कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. तसेच वॉटरग्रेस प्रॉडक्ट्सचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे, अजिंक्य राईकर यांच्यासह एकूण 65 कर्मचार्‍यांनी पंचवटीत स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या