
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
आज निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव व पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे.
या निकाला नंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडूनही पहिली प्रतिक्रिया आली आहे. मूळ शिवसेनापक्ष , बाळासाहेब ठाकरे यांचे मूळविचार हे उद्धव ठाकरे यांच्या कडेच राहणार आहेत आहे, देशात लोकशाहीच राहिलेली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे.
आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागू,' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्रामध्ये खोके सरकार आलं आहे. आज देशभरातल्या जनतेने बघितलं आहे. पण आम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. जनता आमच्यासोबत आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत.