Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवार 'उपमुख्यमंत्री' ; शपथविधी होताच ट्विटर हँडलवरचं प्रोफाईल बदलल

अजित पवार ‘उपमुख्यमंत्री’ ; शपथविधी होताच ट्विटर हँडलवरचं प्रोफाईल बदलल

मुंबई | Mumbai

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या ट्विटर हँडलचे (Twitter Handle Profile) प्रोफाईल बदलले आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये ‘उपमुख्यमंत्री’ (Deputy Chief Minister) पदाचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते पदाचा स्टेटस बदलून त्यांनी उपमुख्यमंत्री असा बायो ठेवला आहे. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी नेता हे स्टेटस तसेच ठेवले आहे. यामुळे राज्याचा दिशेला कोणती कलाटणी मिळणार अशी चर्चा रंगली आहे.

अजित पवारांच्या ट्विटर प्रोफाईलवर राष्ट्रवादीचा झेंडा होता. आता अजित पवारांनी स्वत:चा फोटो आणि त्याखाली बायोमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) चांगलाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षात आता फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर देखील अजित पवारांनी दावा केला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी आतापर्यंत कुठली पदं भूषविली; जाणून घ्या संपूर्ण राजकीय प्रवास

दरम्यान, “राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होते. परंतू मी शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता आणि मागेही मी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मी माझी स्पष्ट भूमिका मांडली होती,” असे अजित पवारांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या