Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशपाच क्विंटल कांदे विकून मिळाला दोन रुपयाचा चेक

पाच क्विंटल कांदे विकून मिळाला दोन रुपयाचा चेक

सोलापूर | Solapur

शेतकऱ्यांने जीवाचे रान करून एखादे पिक काढावे, ते बाजारात विक्रीसाठी न्यावे आणि बाजारात गेल्यावर त्या पिकाला कवडीमोल भाव मिळावा यासारखे वाईट आणखी काय म्हणावे?

- Advertisement -

सध्या कांदा (Onion) पिकासंदर्भात असाच प्रकार घडताना दिसतो आहे. सोलापूरमधील एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याच्या मोबदल्यात केवळ २ रुपयांचा धनादेश मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेंद्र तुकाराम चव्हाण हेच ते शेतकरी “ज्यांनी आपला घाम काळ्या मातील ओतला आणि लाल सोनं पिकवल ; पण त्यांच्या हाती त्याबदल्यात दोन रुपयाची किम्मत मिळाली.”

घडलेली घटना अशी की, सोलापूरच्या बार्शी ( Barshi) तालुक्यातील बोरगाव येथे राहणारे ५८ वर्षीय राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) हे आपला ५१२ किलो  कांदा घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Solapur Agricultural Produce Market Committee) लिलावासाठी पोहोचले. यासाठी त्यांनी ७० किलोमीटर प्रवास केला. मात्र, त्यांच्या कांद्याला केवळ १ रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळाला. त्यामधून सर्व खर्च कपात करून २ रुपयांचा धनादेश त्यांच्या हाती थोपविण्यात आला.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

यासंदर्भात बोलताना संबधित शेतकरी म्हणाले, “मला ५१२ किलो कांद्यासाठी प्रतिकिलो १ रुपया दराने भाव मिळाला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्याने वाहनभाडे, हमाली आणि तोलाई याचे पैसे वजा करून दोन रुपयांचा चेक माझ्या हातात दिला.

मागील तीन ते चार वर्षात खतं, बियाणे आणि कीटकनाशकांच्या (Pesticides) किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. ५१२ किलो कांद्यासाठी मी ४० हजार रुपये खर्च केले. मात्र, नफा तर सोडा साधा लागवडीचा खर्चही निघाला नाही. ही एकप्रकारे शेतकऱ्याची थट्टा आहे.”

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी समाजमाध्यमात हा विषय चर्चेला आणत शासनाचा निषेध नोंदविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या